Tuesday, March 18, 2008

ये भैया



ये भैया

ये भैया........साल्या ज़रा कमी काम कर
आमच्या मराठी माणसाला काम दान कर
हात हलवत साल्या मुंबईत आलास
मराठी माणसाला वाटतय.....महाराष्ट्रापासून पोरका केलास..!!

दिवस भर काम करून उशिरा झोपतोस
थंडी असून सुद्धा रात्री ३ ला उठतोस.....
मराठी माणसाला नाही रे जमत
पण तू ४ ला वाशी मार्केट कसं काय गाठतोस

काय रे बाबा कुठल्या हाडामासाचा बनलास
अति श्रम करून पण न कधी दमलास
लोक म्हणतात तुला आत्ता माज चढलाय
पण मला वाटतय तुझ्यातच मेहनती माणूस दडलाय

मराठी माणसाची आधीच बोंब
कोणीतरी पेटवतो मग आगेचा डोंब
गाढवा सारखा मग वागू लागतो
उद्याच्या महाराष्ट्राची स्वप्ने बघू लागतो

विरारला रहायच, १० ला चर्चगेट गाठायचं
५.३० ला सुटलो की प्रेयसिला भेटायचं
मराठी माणसाने शोधलेला वडापाव
शेजवान जम्बो किंग च्या नावाने रेटायचं

माझ्या मराठी माणसाची नाही रे लांब उडी
नाकी नऊ येतात बसवताना संसाराची घडी
किती कधी कसे मिळतील.....पैसे याचाच विचार करतो
१५ हजरात मिळणा-या अनंदासाठी मर मर मरतो

का नाही करत तो तुझ्या सारखी मेहनत
आणू शकतो रे तो ही......इंद्राचा ऐरावत
समजू नको त्याला तू असा आळशी
गावभर हिंडतोय रे तो असून काखेत कळशी

2 comments:

Ashish said...

मराठी माणुस संध्याकाळी ...
"अरे तुने वो वळु देख्या क्या? अरे मस्त पिक्चर है वो. मिस मत कररे. आपण मराठी पिक्चर देखना मंगता. वो पिक्चर मस्त हैरे माझ्या मित्रा. जरुर देखना क्या.."
" ओ भय्या वो चाट में जरा तिखट पाणि कम डालना...अरे ज्यादा पातळ मत करो"
"उत्तपा अच्छे से परतना..ज्यादा करपाओं मत उसको"
(स्वताःच्या कानाने ऐकलेली वाक्ये आहेत मनाने काहि लिहीत नाहिये)
काल परवा राजकिय फ़ड रंगला अगदि फ़ार दिवसांनी रंगला. काही महाराष्ट्र देशात इम्पोर्ट्रेड नेत्यानी बर्याच उड्या मारल्या. या नेत्यात विशेष नाव घ्यावे असे नेते म्हणजे अमर सिंग आणि अबु आझमी. हे नेते येतात काय काहि तासांसाठि आणि काहिहि बरळतात काय.. बर जाउदे त्या अबुचे काय?

Read further on
http://maharashtramajha.blogspot.com

Akshay kashid said...

kup chan lihilay mitra wa