Thursday, March 27, 2008

"मनसे'ने व्यंगचित्रातून उडविली अमिताभची खिल्ली


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा "छोरा गंगा किनारेवाला' अभिनेता अमिताभ बच्चन याच्याविरुद्ध आवाज उठविला आहे. यावेळी पक्षाने व्यंगचित्राच्या माध्यमातून सुपरस्टार अभिनेत्याची खिल्ली उडविली आहे. श्री. बच्चन यांनी नुकतीच मावळ तालुक्‍यातील पाले येथील २० एकर जमिनीचे दानपत्र मागे घेतले आणि ही जमीन दान करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. यासाठी आपण शेतकरी असल्याचा पुरावाही श्री. बच्चन यांनी सादर केला. या पार्श्‍वभूमीवर, "मनसे'तर्फे बुधवारी रात्री दादर परिसरात या निर्णयाची खिल्ली उडविणारे फलक लावण्यात आले. त्यामध्ये श्री. बच्चन यांचे नाव न देता एक माणूस "माझे दान परत करा' अस म्हणत असल्याचे रेखाटण्यात आले आहे. फलकाच्या खाली "सुपरस्टार शेतकरी' हे दोन शब्द आहेत. गुरुवारी सकाळी हे फलक काढून टाकण्यात आले. फलक कोणी काढले, हे अजून स्पष्ट झाले नाही. "मनसे'च्या मते पोलिसांनीच हे फलक काढून टाकले. "एक सुपरस्टार अभिनेता जर शेतकरी होणार असेल, तर देशातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवसच आलेत हेच यातून दिसते.', हे लोकांपर्यंत पोचविण्यासाठीच आम्ही हे फलक लावल्याचे पक्षाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही कमी होतील, असे मत या प्रवक्‍त्याने व्यक्त केले.

3 comments:

Anonymous said...

माझा post "बहरला पारिजात दारी फूले कां पडती शेजारी"ह्या शिर्षकाने लिहीलेला आहे तो वाचावा.कुणी ते वाचून "शाल जोडीतले...."असं पण मला म्हणाले.
"अमिताभ बच्चनाक मालवणीतून फूक्कटचो सल्लो"
मुद्दाम मालवणी भाषेत मी लिहलं आहे कारण
जरा ठसक्यात लिहायला मालवणी भाषा बरी वाटते. जसं "आली ठुमकत नार लचकत मान
मुरडत हिरव्या रानी" असं काहीसं मालवणीत लिहीता येतं म्हणून.
माझा blog website
shrikrishnasamant.wordpress.com
आणि
Home page
"कृष्ण उवाच "असं आहे

श्रीकृष्ण सामंत
shrikrishnas@gmail.com

Akshay kashid said...

sundar lhila aahe mitra...chala sraw shahanyana dhada shik woo ya

मोरपीस said...

विशेष करून मराठी माणसाला वाहून दिलेला ब्लॉग आहे.